दुकान लावण्यावरून भावाने केला भावाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

साखरगाठीचे दुकान लावण्याच्या कारणावरून भावानेच भावाचा भर बाजारात कत्तीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 4) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

परभणी : साखरगाठीचे दुकान लावण्याच्या कारणावरून भावानेच भावाचा भर बाजारात कत्तीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 4) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

शहरातील भोई गल्ली भागात राहणार युवक सोमनाथ आडणे (वय 24) हा सकाळी गुजरी बाजार परिसरात साखर गाठीचे दुकान लावण्यासाठी आला होता. बुधवारी (ता. 3) रात्री सोमनाथ आडणे याचा त्याचे सावत्र भाऊ सचिन व नितीन आडणे यांच्याशी वाद झाला होता. गुरुवारी (ता.4) सकाळी गुजरी बाजार परिसरात दुकान लावण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.

गुजरी बाजार परिसरात सकाळी मारेकऱ्यांनी धारदार शास्त्राने सोमनाथ आडणे याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोमनाथवर दगड मारून मारेकरी फरार झाले. जखमी अवस्थेत सोमनाथ ला शासकीय रुग्णालयात आणले. परंतु त्यास मयत घोषित करण्यात आले. 

Web Title: brother killed his step brother at Parbhani