मेहुण्याचा बहिणीसमोरच केला खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बीड - प्रेमप्रकरणातून बहिणीसोबत लग्न केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या साहाय्याने मेहुण्याचा बहिणीसमोर चाकूचे वार करून खून केला. ही घटना बुधवारी (ता. 19) सायंकाळी सहा वाजता तेलगाव नाका परिसरात घडली. सुमित शिवाजी वाघमारे (वय 25, रा. तालखेड, ता. माजलगाव, हल्ली मुक्काम नागोबा गल्ली, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी तालखेड येथील सुमित वाघमारे हा बीडमध्ये राहत होता. आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तो शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याच्याच वर्गातील भाग्यश्रीसोबत त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने प्रेमविवाह केला. मात्र, हा विवाह भाग्यश्रीच्या भावाला खटकत होता. त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा भांडणेही झाली. बुधवारी भाग्यश्री व सुमित दोघेही परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आले. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कारमधून भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधून उतरत सुमितवर धारधार शस्त्राने वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले. भाग्यश्री मात्र मोठमोठ्याने ओरडत मदतीची मागणी याचना करत होती. एका रिक्षाचालकाने तात्काळ धाव घेत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, अति रक्तस्रावामुळे रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्‍टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

ही माहिती वाऱ्यासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. भाग्यश्री, सुमितची आई व मावशीने रुग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद पेठबीड ठाण्यात झालेली नव्हती. 

Web Title: brother killed sisters husband in Beed