खूनी भावाला मिळाली शिक्षेची राखी!

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 18 जुलै 2019

विवाहित बहिणीसह तिच्या प्रियकराला तेलंगनातून आणून रस्त्यात कोयत्याने गळा चिरुन ठार मारणाऱ्या दोन भावांना भोकर येथील जिल्हा न्यायाधिश एम. एस. शेख यांनी गुरूवारी (ता. १८ ) एकाला फाशी तर दुसरृयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नांदेड  : विवाहित बहिणीसह तिच्या प्रियकराला तेलंगनातून आणून रस्त्यात कोयत्याने गळा चिरुन ठार मारणाऱ्या दोन भावांना भोकर येथील जिल्हा न्यायाधिश एम. एस. शेख यांनी गुरूवारी (ता. १८ ) एकाला फाशी तर दुसरृयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

भोकर येथील गोविंद कराळे याचे पूजा वर्षेवार हिच्यावर प्रेम होते. यातूनच हे दोघे तेलंगनामधील खरबळा (ता. मुधोळ जिल्हा निर्मल) येथे पळून गेले होते. आपल्याच समाजातील युवकासोबत बहिण पळून गेल्याचा राग भावाला होता. विवाहित महिलेचे भाऊ दिगांबर दासरे आणि मोहन दासरे यांनी संगनमत करून बहिणीला आणि तिच्या प्रियकराला विश्‍वासात घेऊन बासर येथे लग्न लावून देतो. म्हणजे समाजात आमची बदनामी होणार नाही. असे म्हणून ता. २३ जूलै  2017  खरबळा येथून दुचाकीवर या दोघांना घेऊन भोकर तालुक्यातील दिवशी या शिवारात आणले.

दुचाकी थांबवून पूजाला आणि गोविंद कराळे यांना झूडपाच्या आड नेऊन त्यांचा कोयत्याने गळा चिरून खून केला होता. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात फौजदार सुशिल चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सहा साक्षिदार तपासले. सरकार पक्षाच्या वतीने रमेश राजूरकर यांनी काम पाहिले. शेवटी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिश एम. एस. शेख यांनी दिगांबर दासरे आणि मोहन दासरे या भावंडांना फाशी व जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother recieved punishment for his crime