BSNL ची नेटवर्क सेवा 'कोमात'; तीन दिवसांपासून नेटवर्क गायब

दिलीप गंभीरे
Wednesday, 20 January 2021

मागील तीन दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क गायब झाले आहे

कळंब (उस्मानाबाद): तंत्रज्ञाच्या युगात आज काही सर्व सोपे सोयीस्कर झाले असून यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र हीच भारत संचार निगमची नेटवर्क सेवा तीन दिवसांपासून कोमात गेल्याने हजारो ग्राहकांना फटका बसला आहे. बीएसएनएल ची नेटवर्क सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची चांगलीच फजिती होत असून कामाचा खोळंबा होत आहे. सोलापूर बार्शी भागात तांत्रिक दोष निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील तीन दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क गायब झाले आहे. त्यामुळे बीएसएनएल च्या नेटवर्कवर अवलंबून असलेली सर्व सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला आहे. यामुळे हजारो ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर - कारचा भीषण अपघात

ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा थांबला आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक आपली प्रलंबित कामे करून घेण्यासाठी धावाधाव करीत आहे. मात्र मागच्या तीन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा कोमात गेली आहे. कॉल कट होने, रेंज गायब, नेटवर्क तर कसलेच कळंब तालुक्यात मिळत नाही. तांत्रिकदृष्ट्या निर्माण झालेला दोष सापडत नसल्याने बीएसएनएलचे अधिकारी हतबल झाल्याची माहिती आहे.

बीएसएनएलने ग्राहकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.अखंडित व मजबूत सेवा देण्यासाठी व आपली पकड मजबूत करण्याची तयारी केली आहे.फास्ट इंटरनेट सेवा देण्यासाठी म्हत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.त्यातच मागच्या तीन दिवसांपासून ही सेवा कोमात गेल्याने ग्राहकामधून तीव्र नाराजी आहे.

वाळूजमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात, रिक्षाचा चुराडा

बीएसएनएल ची टीम कुचकामी-

बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्क मघ्ये कुठे दोष झाला याचा शोध घेणारे आधुनिक तंत्रज्ञन विकसित झाले आहे.अद्ययावत यंत्रणा उपलब्द असताना कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत आहे.नेटवर्क सेवा कोलंमडल्याने लाखो रुपयांचा आर्थिक फटका दिवसागणिक या कंपनीला सहन करावा लागत आहे.तांत्रिक अधिकारी तसेच मोठी टीम या कंपनीकडे उपलब्ध असतानाही दोष काढण्यास बीएसएनएल ची कुचकामी ठरत आहे.

'उदगीरची दगडफेक धार्मिक नसून पोलिसांवर हल्ला होता'

तीन दिवसानंतरही दोष सापडेना-

सध्या कळंब बार्शी मार्गाचे काम सुरू असून बहुतांश जिल्ह्यात कामे सुरू आहेत.रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांना अवगत आहे.केबल तुटलं तुटुदे बघू जरा सावकाश अशी भूमिका घेण्यात येत असल्याने आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना तीन दिवसांपासून दोष सापडत नाही.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL network down in kalamb usmanabad news