या ’ ईमारत बांधकामाने नांदेडच्या वैभवात भर  

file photo
file photo

नांदेड : आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी न्यायालय व पोलिस यांच्यातील दुवा म्हणून तपास यंत्रणेला अतिशय महत्वाची भुमिका बजावणारा विभाग म्हणजे सहाय्यक न्याय वैद्यक शास्त्र  (फॉरेन्सीक लॅब) होय. या ईमारतीला आता स्वत: ची जागा मिळून त्यावर टोलेजंग आधुनिक पध्दतीने ईमारत बांधकाम सुरू झाले. यामुळे किचकट गुन्ह्याची आता वेगाने होणार सोडवणूक. 

येथील फॉरेन्सीक लॅबचे काम सध्या आरोग्य विभागाच्या जुन्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या इमारतीतून मागील पाच वर्षापासून चालते. या लॅबअंतर्गत नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचे कामकाज चालतो. या विभागाला स्वतंत्र इमारत नसल्याने अनेक महत्वाच्या तपासात पोलिसांना अडथळे येत आहेत. या लॅबमधून नेमक काय कामकाज चालते हे सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही. त्यांचा कधी संपर्क येत नाही. पोलिस आणि हा विभाग किचकट गुन्ह्यातील सत्यता शास्त्रशुध्द पध्दतीने पडताळणी करून समाजासमोर आणतात.  

एखाद्या प्रकरणात मृत्यूच नेमक कारण, मृत्यूची वेळ आणि नेमका मृत्यू कशामुळे झाला या सगळ्यासाठी फॉरेन्सीक लॅबची महत्वाची मदत होते. तसेच खूनाच्या वेळी आरोपीने कोणते हत्यार वापरले गेले आहे, यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही लॅब करित असते. फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजीस्ट गुन्ह्यासाठी वापरलेल्या रासायनीक पदार्थाचा शोध घेतात (विष, अमली पदार्थ, रासायनीक दृव्य इत्यादी). फॉरेन्सिक मानसतज्ज्ञ गुन्ह्याच्या पध्दतीवर गुन्हेगारांच्या मानसिकतेचा शोध घेऊन खरा गुन्हेगार समाजासमोर आणतात. तसेच फॉरेन्सीक ओडोन्टोलाजीस्ट दातांचा अभ्यास करून गुन्ह्याचा मागोवा लावतात. दातावरुन मृत व्यक्तीच वय तसेच त्याची ओळक पटविण्यात हा घटक मदत करते. फॉरेन्सिक ॲंथ्रापॉलॉजीस्ट मृतदेह गाडला असेल वा विमान अपघात, अतिरेकी हल्ला, नैसर्गीक आपत्तीत मृतदेह ओळखण्यापलिकडे गेला असेल तर फॉरेन्सिक ॲंथ्रापॉलॉजीस्टच्या मदतीने मृत व्यक्तीचे वय, लिंग ओळखण्यासाठी मदत होते. 

अशा या महत्वपूर्ण विभागाला आता स्वत: ची इमारत मिळणार आहे. शहराच्या विष्णुपूरी परिसरातील साडेतीन एकर जागेमध्ये पाच मजली ईमारत बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे नांदेडच्या वैभवात भर पडणारा एक मैलाचा दगड असल्याचे बोलल्या जात आहे. या नविन इमारतीत मंजुर झालेले डीएनए आणि सायबर हे विभाग सुरू होणार. त्यामुळे या विभागाशी संबंधीत असलेल्या गुन्ह्याचा तपास लवकर लागु शकतो. याचा फायदा पोलिसांना होऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचता येते. अनेक किचकट गुन्ह्याची उकल झाल्याने खऱ्या अर्थाने न्यायालय व पोलिस यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून ही लॅब काम करते. 
सध्या या लॅबमध्ये जीवशास्त्र, विष शास्त्र, सामान्य विश्‍लेषन विभाग आणि दारुबंदी हे विभाग कार्यरत आहेत. 

 बांधकामाला सहकार्याची गरज

विष्णुपूरी परिसरात फॉरेन्सिक लॅबच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या नविन इमारतीचा फायदा नांदेड परिक्षेत्रातील पोलिस विभागाला होणार आहे. किचकट गुन्ह्याचा निकाल या ठिकाणी तात्काळ लागणार असून मुंबई, पुणे या शहरात येथील गुन्ह्यातील नमुना तपासणीसाठी पाठवायची गरज नाही. या लॅब बांधकामाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कारण महाराष्ट्रातील अत्याधुनिक पध्दतीने एक सर्वसोयीयुक्त इमारत ही नांदेडच्या वैभवात भर टाकणारी असल्याचे श्री. नवाळे यांनी सांगितले. 
वि. मा. नवाळे, उपसंचालक, फॉरेन्सीक लॅब, नांदेड विभाग.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com