रस्ता सुरक्षा अभियानात बुलेटधारकांची हेल्मेट फेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

लातूर - प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर पोलिस वाहतूक शाखा व वंडर्स बुलेटियर्स ऑफ लातूरच्यावतीने हेल्मेटबाबत जागृती करण्यासाठी मंगळवारी (ता. १७) शहरातून बुलेटधारकांची हेल्मेट फेरी काढण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी या फेरीचे नेतृत्व केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून फेरीला सुरवात झाली. तेथून ही फेरी बाभळगाव नाका, बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, पीव्हीआर चौक, शिवाजी चौक, गांधी चौकातून परत शिवाजी चौकमार्गे येऊन फेरीचा पोलिस अधीक्षक कार्यालयात समारोप झाला. या वेळी अपर पोलिस अधीक्षक लता फड व पोलिस उपअधीक्षक (गृह) दीपक शिंदे उपस्थित होते. श्री. भोर व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे तसेच वंडर्स बुलेटीअर्सचे सदस्य या फेरीत सहभागी झाले होते.

Web Title: bullet helmet rally for road security campaign