बिबट्याच्या हल्ल्यात आनाडला गोऱ्हा ठार

जितेंद्र जाेशी
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

अजिंठा, ता. 20 (जि.औरंगाबाद) ः आनाड (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (ता. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सायंकाळी शेतकरी विष्णू गंभीरराव जाधव यांनी आपल्या शेतातील वखाराच्या शेजारीच असलेल्या झाडाखाली बैल, गायी, म्हशी, गोऱ्ह्याला चारा-पाणी करून बांधले होते. बिबट्याने या ठिकाणी येऊन गोऱ्ह्यावर हल्ला केल्यानंतर गाई, म्हशी, बैल मोठमोठ्याने हंबरू लागली. त्या आवाजाने विष्णू जाधव यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या बांधलेल्या गोऱ्ह्याला पाठीमागून पकडून हल्ला करीत होता. जाधव यांनी आरडाओरड करीत आजूबाजूच्या वाड्यांवरील लोकांना उठवले.

जमावाच्या आवाजाने काही अंतरावरच मक्‍याच्या शेतात बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गोऱ्ह्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनरक्षक रफीक पठाण, वन मजूर वाल्मीक साबळे आदींनी घडनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असून, वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullk Died In Leopard attack