तीन ठिकाणी घरफोडी करून कॅमेरा, लॅपटॉप लांबविले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - अमेरिकेत गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य नागरिकांची घरे फोडून चोरांनी दोन लॅपटॉपसह रोकड लांबव्विली. या घटना रविवारी (ता. 13) उघड झाल्या. 

औरंगाबाद - अमेरिकेत गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य नागरिकांची घरे फोडून चोरांनी दोन लॅपटॉपसह रोकड लांबव्विली. या घटना रविवारी (ता. 13) उघड झाल्या. 

अनिल बळीराम पाटील (रा. टाऊन सेंटर) हे वैद्यकीय अधिकारी अमेरिकेत मुलीच्या भेटीसाठी 12 मार्चला गेले होते. यानंतर संधी साधून चोरांनी गच्चीवरून घरात प्रवेश केला. चाचपणी केली; मात्र त्यांच्या हाती दागिने लागले नाहीत. घरातील लॅपटॉप त्यांनी लंपास केला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. दुसरा प्रकार उस्मानपुरा येथे उघड झाला. तुकाराम बजरंग लोधवाल (रा. गुरुगोविंदपुरा, उस्मानपुरा) यांच्या घरातून चोरांनी लॅपटॉप, कॅमेरा, मोबाईल असा एकूण चाळीस हजारांचा ऐवज लांबविला. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोराविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. निखिल धर्मराज तराळे (रा. न्यू एसटी कॉलनी) हा तरुण रविवारी घराचा दरवाजा लोटून नोकरीवर गेला, त्या वेळी चोरट्याने लॅपटॉप लांबविला. तराळेच्या तक्रारीनुसार या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Burglary three places