कळमनुरी : बस पंढरपूरला सोडून चालक, वाहक गायब!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कळमनुरी - कळमनुरी आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बस घेऊन गेलेल्या वाहकाने तिकिटाची रक्कम कार्यालयाकडे जमा न केल्यामुळे शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सोमवारी (ता. ३०) त्याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कळमनुरी आगारातून पंढरपूर यात्रेसाठी २२ जुलैला बस पाठविण्यात आली होती. पंढरपूरला गेल्यानंतर बस तेथेच सोडून चालकासह वाहक आर. बी. टाळकुटे गायब झाले. त्यानंतर तेथील प्रशासनाने अन्य चालक, वाहकाची तात्पुरती व्यवस्था करून ही बस कळमनुरी आगाराकडे रवाना केली. त्यानंतर आगार प्रशासनाने वाहक टाळकुटे यांना तिकिटापोटी जमा झालेले आठ हजार ५१४ रुपये जमा करायला सांगितले. त्याला त्याने नकार दिला. वाहतूक निरीक्षक सुनीता गोरे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वाहक टाळकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चालक व वाहकाच्या या बेजबाबदार वर्तनाबाबत महामंडळाकडूनही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: bus driver conductor missing crime