परभणीतील वऱ्हाडींच्‍या बसचा ‘बर्निंग’ थरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जळगाव - खरगोन (मध्यप्रदेश) येथून वऱ्हाडी घेऊन परभणीकडे निघालेल्या खासगी बसने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला. चालकाने तत्काळ बस थांबवत सर्व प्रवाशांना काही मिनिटांत खाली उतरवून घेतले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सुमारे ३५ प्रवाशांचा जीव वाचला. बसचा मात्र कोळसा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज सायंकाळी सातच्या सुमारास हा थरार घडला.

परभणी जिल्ह्यातील सुधीर नारायणप्रसाद जैस्वाल यांच्या पुतण्याचे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात लग्न होते. लग्न आटोपून जैस्वाल कुटुंबीयांचे वऱ्हाड खासगी बसने (एमएच११, टी ९७७७) जळगाव मार्गे परभणीसाठी निघाले होते. जळगाव-औरंगाबाद मार्गावरील विटनेर (ता.जामनेर) जवळ धावत्या बसमधून वायरिंग जळण्याच्या उग्र दर्पासह धूर निघत असल्याचे एका प्रवाशाने चालक शेख हुसैन शेख अलाउद्दीन यांना सांगितले. त्यांनी जागीच बस थांबवून पस्तीस प्रवाशांना उतरण्याच्या सूचना केल्या. चालक अलाउद्दीन व त्याच्या सहकाऱ्यांनी बसच्या डिक्कीतील साहित्य रस्त्यावर फेकले. इतक्‍यात केबिनमध्ये जाळ उठून काही सेकंदातच बस पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. म्हसावद औटपोस्टच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दलास पाचारण केले. जामनेर पालिका, जैन उद्योग, जळगाव महापालिकेच्या बंबांनी आग विझवली. 

वऱ्हाडींकडून चालकाचे आभार
प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल बसचालक शेख हुसैन शेख अलाउद्दीन यांचे जैस्वाल परिवारासह सर्व वऱ्हाडींनी आभार मानले. 
दरम्यान, या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: bus fire