राज्यस्तरीय बिझनेस महाएक्‍स्पो आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - शिवाई मराठा महिला मंडळ आणि महाबिझनेस नेटवर्कतर्फे (एमबीएन) आयोजित राज्यस्तरीय बिझनेस महाएक्‍स्पोला गुरुवारपासून (ता. २५) सुरवात होत आहे. श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी ११ वाजता या एक्‍स्पोचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होईल.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर असतील. कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम, उद्योजक पद्माकरराव मुळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, राजेश टोपे, भाऊसाहेब चिकटगावकर, रंगनाथ काळे, कल्याण काळे, केशवराव औताडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, सचिन मुळे, अंबादास दानवे, प्रदीप सोळुंके, प्रमोद खैरनार, बालाजी शिंदे, राम पवार यांची उपस्थिती राहील. यावर्षी १४५ स्टॉल्स आहेत. यात बांधकाम व्यावसायिक, इंडस्ट्रियल, ट्रेडर्स, सेवा क्षेत्र, फूड, गृहउद्योगाचे स्टॉल असतील. उद्योगाचा परिचय देण्यासोबत ग्राहकांना स्वस्त दरात अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे शिवाईच्या पुष्पा काळे यांनी सांगितले. कार्यक्रमाला शहरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नीता देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. रंजना देशमुख यांनी केले. 

Web Title: Business mahaexpo