शासन निर्णयाविरोधात व्यापाऱयांचा बंद ; तिसऱया दिवशीही व्यवहार ठप्प

हरी तुगावकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

बाजार समितीच्या वतीने आज बैठक घेण्यात आली. त्यात व्यवहार सुरु करण्याची विनंती करण्यात आली. पण व्यापारयांनी मंत्रिमंडळाचा निर्णयच बैठकीत दाखवला. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने बाजार सुरु होऊ शकला नाही. राज्यातील बहुतांश बाजार समित्यात अशीच परिस्थिती आहे.

- ललितभाई शहा, सभापती, लातूर बाजार समिती.

लातूर : शेतमालाची हमी भावाने खरेदी केली नाही तर एक वर्षाची शिक्षा व दंडाची तरतूद राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे राज्यभरातील व्यापाऱय़ात अंसतोष व भिती पसरली आहे. यातून आडत बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. 

सोमवारपासून येथील लातूर उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीचा आडत बाजार बंद आहे. आज तिसरा दिवस होता. बाजार समितीच्या सभापतींनी बुधवारी बैठक घेऊन व्यापाऱय़ांना व्यवहार सुरु करण्याची विनंती केली. पण व्यापारी
मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा व्यवहार ठप्प राहिला आहे. व्यापारात मागणी व पुरवठ्यांवर भाव ठरतात. तेजी व मंदी सातत्याने असते. पण
शासनाने हमी भावाने शेतमालाची खरेदी केली नाही. तर एक वर्ष शिक्षा व 50 हजार रुपये दंडाची शिक्षेची तरतूद केली आहे.

त्यात सध्या बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडलेले आहेत. एकही शेतमाल हमीभावाने विकला जात नाही. त्यात शासनाने हा निर्णय घेतल्याने व्यापाऱयात भितीचे वातावरण आहे. हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली तर कारवाई होईल, अशी भिती व्यापाऱयात आहे. त्यामुळे व्यापाऱयांनी बंदचा मार्ग अवलंबला आहे. यातून सोमवारपासून येथील आडत बाजार बंद आहे. 

बाजार समितीच्या वतीने सौद्यासाठी झेंडा फिरवण्यात
आला पण खरेदीसाठी एकही व्यापारी पुढे आला नाही. बुधवारीही असाच प्रकार घडला. दरम्यान बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी बैठक घेवून व्यवहार सुरु करण्याची विनंती केली. पण व्यापारी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे कोट्यवधीचा व्यवहार ठप्प राहिला आहे.

Web Title: Businessmen did Bandh Against Government Decisions