नाफेडतर्फे पाच हजार क्‍विंटल हरभरा खरेदी ; गंगापूर, पैठण केंद्रावर सर्वाधिक आवक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

राज्यभरात नाफेडतर्फे 11 मार्चपासून हरभरा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड येथे हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद : तूरप्रमाणेच नाफेडतर्फे ऑनलाइन पद्धतीने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर आतापर्यंत 450 शेतकऱ्यांचा 4 हजार 978 क्‍विंटल हरभार खरेदी करण्यात आला आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

राज्यभरात नाफेडतर्फे 11 मार्चपासून हरभरा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड येथे हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

आधी नोंदणी आणि त्यानंतर खरेदी अशी प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागाअंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख 44 हजार 635 हेक्‍टर असून, यंदा 9 लाख 7 हजार 80 हेक्‍टरवर पेरणी झाली. 

यंदा अनेक जिल्ह्यात हरभऱ्यास एकरी चांगला उतारा मिळत असून आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 4 हजार 400 रुपये असताना खुल्या बाजारात मात्र तीन हजार 300 रूपये दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक हरभरा खरेदी गंगापूर केंद्रावर (2564 क्विंटल) तर सर्वात कमी वैजापूर केंद्रावर (4 क्विंटल) करण्यात आला. हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी करून आपला माल विक्री आणण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Buy 5 thousand quintals of gram of Nafed