असा भीषण अपघात, की कारचा झाला चकणाचूर : चालक जागीच ठार

अनिरुद्ध धर्माधिकारी
Friday, 27 December 2019

या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर वाहनचालकांना जपूनच जावे लागते. चालकाला अंदाजही येणार नाही, अशा प्रकारचे हे वळण असून, या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

आष्टी : कितीही आलिशान कार घ्या, की सेफ्टीसाठी एअरबॅग असलेल्या गाड्या वापरा. काळ आला, की कोणीच काही करू शकत नाही. असंच काहीसं या अपघातात झालं. वळणाचा अंदाज न आल्यानं एका व्यापाऱ्याला हकनाक जीव गमवावा लागला. 

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड-नगर राज्यमार्गावर तालुक्यातील पोखरी गावाजवळ हा अपघात झाला.

Image may contain: 1 person, smiling, close-up
मृत विशाल ऊर्फ बंटी काकासाहेब पवार

याबाबत समजलेली माहिती अशी, की जामखेड येथील भुसार व्यापारी आणि आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले विशाल ऊर्फ बंटी काकासाहेब पवार (वय 30 वर्षे, रा. जामखेड), पवन गायकवाड (वय 31 वर्षे, रा. जातेगाव) व आकाश अभिमन्यू उगले (वय 32 वर्षे, रा. जामखेड) हे तिघे तरूण आपल्या टाटा इंडिगो कारने (क्र. एमएच16 एक्यू5050) शुक्रवारी (ता. 27) पहाटे जामखेड येथून नगरकडे निघाले होते. 

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

नगर-बीड राज्य मार्गावर तालुक्यातील पोखरी गावाजवळील पुलावर चालक विशाल पवार याचा कारवरील ताबा सुटल्याने कार पुलाजवळ रस्त्याच्या खाली उतरून झाडावर जाऊन आदळली. या अपघातात विशाल पवार याचा जागीच मृत्यू झाला. तर पवन गायकवाड व आकाश उगले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

आधीही झाले अनेक अपघात

या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर वाहनचालकांना जपूनच जावे लागते. चालकाला अंदाजही येणार नाही, अशा प्रकारचे हे वळण असून, या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car Accident on Beed Nagar Highway Near Kada Ashti Beed News