इंजिनमध्ये स्फोटानंतर कार पलटी; सहा भाविक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

बीड : विशाखापट्टनमहून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन सहा भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सात) सकाळी शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशाखापट्टनम येथील सहा भविक कारने शिर्डीला दर्शनासाठी जात होते. शुक्रवारी सकाळी त्यांची कार (क्रमांक ए. पी. ३३. २२४७) शहराच्या बाह्यवळण रस्त्याने जात इंजिनधून धुर आणि जाळ निघायला सुरु होऊन अचानक स्फोट झाला. यामुळे भेदरलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने दोन पलटी खाल्ल्या. यामध्ये आर. लक्ष्मी, आर. रत्नम, सिताराम मुथ्थी, विशाल परत्तम, आर. राजनम, आर. गोदावरी हे सहा भाविक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील दोघांना गंभीर जखमा झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: car accident in beed six injured

टॅग्स