दैव बलवत्तर म्हणून वाचली दोन मुले

औरंगाबाद - सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडदरम्यान रस्त्यावरील माठ विक्री करणाऱ्यांचे असे नुकसान झाले.
औरंगाबाद - सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडदरम्यान रस्त्यावरील माठ विक्री करणाऱ्यांचे असे नुकसान झाले.

औरंगाबाद - सुसाट चारचाकी कारने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवलेल्या माठावरच आपली सुसाट चारचाकी वाहन घातल्याची घटना शनिवारी (ता.२०) रात्री बाराच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ घडली. विशेष म्हणजे तेथे झोपलेल्या दोन मुलांच्या अंगावर माठाचे तुकडे फेकल्या गेले; मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावले.

सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर या रस्त्याच्या कडेला माठासह अनेक वस्तू विक्रीला ठेवलेल्या असतात. विक्री करणारे रात्रीला तिथेच निवारा करून राहतात. या रस्त्यावरील साई युरॉलॉजी हॉस्पिटलच्या समोरील बाजूस शनिवारी रात्री एका वाहनाने जोराची धडक दिली. रस्त्याच्या कडेचे जवळपास दोनशे ते तीनशे माठाचे तुकडे झाले. सुरवातीला मोठा आवाज झाल्याने ही मुले घाबरून गेली होती. पळण्याच्या स्थितीत असतानाच दोघांच्या अंगावरही माठांचे तुकडे उडाले आणि क्षणार्धात ते वाहन सुसाट निघून गेले. या प्रकारानंतर येथे एकच गर्दी झाली. पोलिस अधिकाऱ्यांनीही येथे थांबून चौकशी करीत पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. घाबरून गेलेल्या मुलांना ॲड. तथागत कांबळे, संजय वाघमारे यांनी धीर दिला. घटनास्थळी सदरील वाहनाची नंबरप्लेट सापडली असून, या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दीपक सोनवणे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com