आमदार नारायण कुचे यांच्या कारला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जालना - बदनापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांची स्कॉर्पिओ गाडी व ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आमदार कुचे यांच्यासह सहाजण जखमी झाले. सोमवारी (ता. 24) सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी उद्यानासमोर ही घटना घडली. 

जालना - बदनापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांची स्कॉर्पिओ गाडी व ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आमदार कुचे यांच्यासह सहाजण जखमी झाले. सोमवारी (ता. 24) सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी उद्यानासमोर ही घटना घडली. 

श्री. कुचे कारने (एमएच 20 बीएन 7105) अंबडकडे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्याच वेळी औरंगाबाद चौफुलीकडे जाणारी ऍपे रिक्षा (एमएच 21 व्ही 4105) व कुचे यांच्या कारची छत्रपती संभाजी उद्यानासमोर समोरासमोर धडक झाली. अपघातात श्री. कुचे यांच्या डोक्‍याला व पायाला मार लागला. तर ऍपेचालक युवराज चंदू शेकळे (वय 20) याच्यासह प्रवासी सुदर्शन काकासाहेब नन्नवरे (वय 12), नवनाथ गोरख तुबे (वय 15), अमोल थावरा राठोड (सर्व रा. देवपिंपळगाव) व अशोक अमोल राठोड (रा. सिरसवाडी) जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार, उपनिरीक्षक श्री. बोडखे, रामेश्‍वर जाधव, श्री. बिल्लारे घटनास्थळी पोचले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. श्री. कुचे यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुचे यांची भेट घेतली. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. 

Web Title: car accident of MLA Narayan Kuche