Accident News : नाशिक महामार्गावर कार व दुचाकीचा विचित्र अपघात; एका युवकाचा मृत्यू

माळीवाडा ते शेरणापूर टी पॉईंट दरम्यान असलेल्या नाशिक महामार्गावर चार चारचाकी व दोन दुचाकी वाहनां मध्ये विचित्र अपघात
car accident nashik highway youth dies police traffic
car accident nashik highway youth dies police trafficesakal

दौलताबाद : माळीवाडा(ता.छत्रपती संभाजीनगर)ते शेरणापूर टी पॉईंट दरम्यान असलेल्या नाशिक महामार्गावर चार चारचाकी व दोन दुचाकी वाहनां मध्ये झालेल्या विचित्र अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला तर इतर वाहनातील प्रवाशी किरकोळ जखमी झाले,

car accident nashik highway youth dies police traffic
Accident : पिकअप व ट्रॅक्टरचा अपघात; आठ जण गंभीर जखमी

असे की शरणपूर येथील दुचाकी धारक शंकर उर्फ अजय सीताराम कान्हेरे(वय24)राहणार शरणापूर ता.जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आपल्या दुचाकी(क्रमांक mh20ex1316)वरून माळीवाड्यावरून दौलताबाद टी पॉइंट कडे जाताना हॉटेल प्रवीण समोर शंकर यांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव मारुती स्विफ्ट कार(क्रमांक पाटी काढलेली ) मधील तरुणांनी पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.

car accident nashik highway youth dies police traffic
Accident News : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक; तीन ठार, दोन जखमी

यात दुचाकी वरील शंकर हे गंभीर जखमी झाले या घटने पाठोपाठच या स्वीट कारला इतर चार कार एका मागे एक धडकल्याने या चार वाहनांमध्ये सुद्धा अपघात झाला यात परत एक दुचाकी येऊन धडकल्याने तो दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला ही घटना मंगळवारी(ता.07) दुपारी दोनच्या सुमारास घडली मंगळवारी धुलीवंदन असल्याने मोठ्या संख्येने वाहनधारक हे मध्य धुंद अवस्थेत आढळून येत होते प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार या स्विफ्ट कार मधील युवक मद्यधुंद अवस्तेत होते व या धुंदीतच त्यांनी दुचाकी ला पाठीमागून धडक दिली,

car accident nashik highway youth dies police traffic
Nashik Accident News : नाशिक- मुंबई महामार्गावर विचित्र अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर कारमधील युवक कार घटनास्थळावरच सोडून प्रसार झाले, या घटनेनंतर दौलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना घाटी दवाखान्यात दाखल केले, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ए एस आय डि बी तडवी पुढील तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com