चक्क प्रवाशांसमोरच उतरविले वाहकाचे कपडे !

पथकाकडून तपासणी
पथकाकडून तपासणी

परभणी :  तपासणीच्या नावाखाली एका ‘एसटी’च्या वाहकास आरेरावीची भाषा वापरून ‘एसटी’च्या दोन तपासणीकांनी चक्क प्रवाशांसमोर वाहकाच्या अंगावरील कपडे उतविल्याचा धक्कादायक प्रकार आष्टीहून पाथरीकडे (जि.परभणी) येणाऱ्या बसमध्ये गुरुवारी (ता.२१) घडला.

दरम्यान, या प्रकारामुळे सदर वाहकास मानसिक त्रास सहन करावा लागला असून संघटनांनी या घटनेचा निषेध करत तपासणी पथकाने केलेला प्रकार हा घृणास्पद असून कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहणारी ही घटना असल्याचे म्हटले आहे.

आष्टीहून पाथरीकडे येणाऱ्या बसची तपासणी वडी पाटी ते हदगाव दरम्यान, गुरुवारी (ता.२१) झाली. तपासणी पथकातील तपासणीक आर. जी. शिंदे व बी. डी. जाधव जाधव यांनी ही बस थांबवून वाहक जी. एन. वाघमारे यांची देखील तपासणी केली. परंतू बसमध्ये कोणतेही अक्षेपार्ह आढळले नाही. पथकातील हे दोन तपासणीक ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांना काही ही सापडले नसल्याने अखेर नियोजित कामगिरी बदलून या कामगिरीवर का आले म्हणून वाहक श्री. वाघमारे यांच्याकडून जबाब लिहून घेतला. परंतू दोन्ही तपासणीक पुन्हा आक्रमक होऊन त्यांनी वाहक श्री. वाघमारे यांच्या पॅन्ट व शर्टच्या खिशाची तपासणी केली. एका तपासणीकाने तर चक्क त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता त्याला त्यांनी विरोध केला.

त्यामुळे चिडलेल्या दोन्ही तपासणीकांनी वाहक जी. एन. वाघमारे यांना आरेरावीची भाषा वापरून त्यांच्याशी झटापट करत प्रवाश्यासमोरच त्यांच्या अंगावरील कपडे काढून घेतले. या प्रकाराने बसमधील प्रवाशी अंचबित झाले. दरम्यान, या प्रकरणी बसचे वाहक जी. एन. वाघमारे यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सहा डिसेंबरला  एसटी कामगार संघटनेची बैठक


आगाराचे वाहक जी. एन. वाघमारे यांच्यासोहत झालेला हा प्रकार कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहणारा आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरील कपडे काढून घेण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. या प्रकरणातील तपासणीकांना दोषी धरून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. घडलेला प्रकार गंभीर असून या संदर्भात एसटी कामगार संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीची बैठक ता. सहा डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव गोविंद वैद्य यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.


प्रवाशाने देखील केली तक्रार


हा प्रकार ज्या बसमध्ये झाला त्या बसमध्ये प्रवास करणारे प्रवाशी सुयोग मधुकर चौधरी (रा. लिखित पिंपरी ता. परतूर जि.जालना) यांनी याची तक्रार ऑनलाईन पध्दतीने सरकारकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी आपण याच बसने प्रवास करत होतो. आपण वारंवार तपासणी अधिकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी वाहकाचे कपडे काढून घेतले. हा प्रकार अपमानास्पद असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले.



चौकशी करून दोषींवर कारवाई 

या घटनेतील सत्यता पडताळणीसाठी विभागीय वाहतुक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. असा प्रकार खरच झाला असेल तर तो निश्चितच गंभीर आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे परभणी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com