` अशी ` आहे आणेवारी

file photo
file photo

सर्वच तालुके ५० पैशाच्यावर
खरिपाची सुधारीत पैसेवारी जाहीर
नांदेड :  खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी (ता. ३१) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या वर असल्याचा अहवाल सादर केला आहे.  भोकर व लोहा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी प्रत्येकी ५२ पैसे तर नायगाव व कंधार तालुक्याची पैसेवारी ५३ पैसे जाहीर झाली आहे. यापूर्वी ता. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेली हंगामी पैसेवारीही पन्नास पैशाच्या वर जाहीर झाली होती.

राज्यातील कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यात येते. शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे होते. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशाच्यावर जाहीर करण्यात आला. यानंतर शासन नियमानुसार सुधारीत पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली.

यात जिल्ह्यातील एकूण एक हजार ५६२ गावांतील आठ लाख ३५ हजार५११ हेक्टर लागवडी लायक क्षेत्रापैकी सात लाख ८३ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून सुधारीत पैसेवारी निश्‍चित करण्यात आली. यात भोकर व लोहा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी प्रत्येकी ५२ पैसे तर नायगाव व कंधार तालुक्याची पैसेवारी ५३ पैसे जाहीर झाली आहे. इतर तालुक्यांची पैसेवारी त्यापेक्षा अधीक जाहीर झाली आहे.  

तीन टप्यांत पैसेवारी
दरवर्षी हंगामी पैसेवारी ता. ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोंबर; तर अंतिम पैसेवारी ता. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ता. तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

तालुकानिहाय सुधारीत पैसेवारी
(पैसेवारी टक्क्यात नाही; तर पैशात)
नांदेड - ५८, अर्धापूर - ५६, कंधार - ५३, लोहा - ५२, भोकर - ५२, मुदखेड - ५६, हदगाव - ६५, हिमायतनगर - ६६, किनवट - ५४, माहूर - ६६, देगलूर - ६०, मुखेड - ५९, बिलोली - ६०, नायगाव - ५३, धर्माबाद - ६७, उमरी - ६२.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com