आलूर मठाच्या महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा

Osmanabad News
Osmanabad News

मुरुम (जि. उस्मानाबाद) : एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी आलूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील मठाच्या महाराजांवर मुरूम पोलिस ठाण्यामध्ये मंगळवारी (ता. १०) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलूर येथील मठाचे महाराज सुशांत शिवाचार्य महाराजांनी आठ मार्च रोजी मठामध्ये गेल्यानंतर हात धरून वाईट हेतूने खोलीमध्ये ओढले. ही बाब कोणाला सांगितली व पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही म्हणून धमकी दिली असल्याचे या महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून सुशांत शिवाचार्य महाराजांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, सुशांत शिवाचार्य महाराजांनीही मुरुम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचे वडील व काकांच्या विरूद्ध न्यायालयात दावे दाखल का केले म्हणून सात मार्च रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास आठ जणांनी मठामध्ये प्रवेश करून शिविगाळ करून मारहाण केली.

या आठ जणांनी मठाच्या बांधकामाची व साहित्याची तोडफोड करून नुकसान केली असल्याची फिर्याद सुशांत शिवाचार्य महाराजांनी दिली आहे. या फिर्यादीवरून आठ जणांविरूद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com