Maratha Kranti Morcha: लातुरात 103 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

हरी तुगावकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या लातूर बंदमध्ये गैर कायद्याची मंडळी एकत्रित येवून दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल करणे आदी कारणामुळे जिल्ह्यात पाच घटनेत 103 आंदोलनकर्त्यांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर : मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या लातूर बंदमध्ये गैर कायद्याची मंडळी एकत्रित येवून दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल करणे आदी कारणामुळे जिल्ह्यात पाच घटनेत 103 आंदोलनकर्त्यांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येथील महापालिकेत गुरुवारी दुपारी आंदोलनाच्या दरम्यान वीस आंदोलकांनी येवून आयुक्ताची गाडी व मुख्यलेखाधिकारी यांची गाडी व इतर एका वाहनावर दगडफेक तसेच आयुक्तांच्या दालनाचे नुकसान केले. .यात एक लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रमाकांत पिडगे यांच्या फिर्यादीवरून वीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील गंजगोलाई भागात आंदोलनाच्या दरम्यान जिलानी तांबोळी यांना तु इथे का उभा आहे असे म्हणत काही तरुणांनी लाथाबुक्क्या तसेच डोक्यात दगड मारून जखमी केले. या प्रकरणी तांबोळी यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात अमर जांभळदरे याच्यासह सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदूपर येथे अंबाजोगाई रस्त्यावर आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी (एमएच २४-७७३) ही तिकडे जात होती. त्यावेळी समोरून आलेल्या जमावाने या गाडीवर दगडफेक करून ४० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी अग्निशमन दलाचे अधिकारी नागनाथ उपरवाडे यांच्या फिर्यादीवरून 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर येथेच आगारात उभा करण्यात आलेल्या एमएच 20 बीएल 0579 या बसवर दगडफेक करून 20 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी पुंडलिक आणेकर यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात गु्न्हा नोंद झाला आहे.

औसा येथील नागरसोगा मोड य़ेथे परिवहन महामंडळाची बस (क्र. एमएच 20 बीएल 0522) ही औशाकडे जात असताना तीघे मोटार सायकलवरून तेथे आले. गतिरोधकावर बसचा वेग कमी होताच या बसवर दग़डफेक करून ब बसचे 35 हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी चालक भारत पवार यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: case filed against agitators in latur maratha kranti morcha