बीड : भाजप आमदाराने बनावट स्वाक्षऱ्या करून केली फसवणूक; गुन्हा नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

- भाजप आमदार संगीता ठोंबरेसह पती विरोधात फसवणूकीचा गुन्हा 
- लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगीरणीतील प्रकरण; केज न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही

बीड : केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) केज पोलिस ठाण्यात फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगीरणीच्या संचालकपदावर नेमणूकीसाठी बनावट स्वाक्षऱ्या केल्याची तक्रारीवरुन केज न्यायालयाच्या आदेशाने हे गुन्हे नोंद झाले.

Image may contain: 1 person, close-up

भाजप आमदार संगीता ठोंबरे या केज तालुक्यातील लहूरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. बनावट स्वाक्षऱ्या करून या सुतगिरणीच्या संचालक पदावर नियुक्ती केल्याची फिर्याद गणपती सोनाप्पा कांबळे यांनी केली होती.

Image may contain: 1 person, smiling, close-up

सदर गैरव्यवहारात आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी खोट्या स्वाक्षऱ्या असल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ आश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथ पत्र जोडून ॲड. संतोष मुंडे यांच्या मार्फत तक्रार दिली होती. यावरुन प्रथमवर्ग न्यायाधीश मनिषा थोरात यांनी बुधवारी (ता. ११) आमदार संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागीतली होती. परंतु, अखेर मंगळवारी दुपारी केज पोलिस ठाण्यात ४१०/२०१९ या क्रमांकाने फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against MLA Sangeeta Thombre and Vijay Prakash Thombre