हिंगोली : खून प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पारवा येथील श्री कदम हे मागील वीस दिवसांपासून बेपत्ता होते शुक्रवारी ( ता१८ ) त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे श्री कदम यांचा खून की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला होता.

हिंगोली : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांचा खून झाल्याची तक्रार कुरुंदा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी शनिवारी (ता. १९) तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पारवा येथील श्री कदम हे मागील वीस दिवसांपासून बेपत्ता होते शुक्रवारी ( ता१८ ) त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे श्री कदम यांचा खून की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज पहाटे यांचा मुलगा संदीप कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये त्यांच्या अनैतिक संबंधातून तसेच दोन एकर जमीन नावावर का करुन देत नाही या कारणावरून खून केल्याचे तक्रारीत नमूद केले.

यावरून कुरुंदा पोलिसांनी एका महिलेसह विठ्ठल नामदेव कदम, बालाजी कदम यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पुढील तपास करीत आहेत. मयत श्री कदम यांचा खून कसा केला हे  तपासात स्पष्ट होणार असल्याचे कुरुंदा पोलिसांनी सांगितले.

Web Title: case filed against three persons in murder case