हिंगोली : सेनगाव तालुक्यात परिक्षा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील संत गजानन महाराज विद्यालय व रेखे बाबा विद्यालय याठिकाणी इयत्ता दहावी परीक्षेला अनधिकृतरित्या शाळा बाहेरील विद्यार्थी बसवून शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खोटा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल केली.

हिंगोली : सेनगांव तालुक्यातील कापडसिंगी येथील इयत्ता दहावीच्या परिक्षा घोटाळा प्रकरणी दोन शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा सेनगाव पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील संत गजानन महाराज विद्यालय व रेखे बाबा विद्यालय याठिकाणी इयत्ता दहावी परीक्षेला अनधिकृतरित्या शाळा बाहेरील विद्यार्थी बसवून शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खोटा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल केली. या शाळांनी यु-डायस वर 175 विद्यार्थी दर्शवले मात्र 378 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन फॉर्म भरून त्यांना अनधिकृतरित्या परीक्षेला बसवून खोटे दस्तऐवज तयार केल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते.

याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी सिताराम जगताप यांच्या तक्रारीवरून रेखे बाबा विद्यालयाचे पदाधिकारी पांडुरंग कचरे, पवन गायकवाड , दीपक श्रीरामे, चंद्रकांत हराळ, अशोक श्रीरामे , तसेच संत गजानन महाराज विद्यालयाचे राज कुमार वाकळे, भगवान लहाने यांच्यासह अन्य दोघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कारेगांवकर उपनिरीक्षक किशोर पोटे पुढील तपास करीत आहेत पोलिसांच्या तपासामध्ये इयत्ता दहावी परिक्षेचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: case filed in Hingoli