बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळकेंसह दोघांवर गुन्हा दाखल

आष्टी तालुक्यात देवस्थान इनाम जमिनींचे प्रकरण गाजत असताना त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
गुन्हा
गुन्हा

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यात देवस्थान इनाम जमिनींचे प्रकरण गाजत असताना त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. तालुक्यातील देवीनिमगाव येथील वक्फ बोर्डाच्या सुमारे 40 एकर जमिनीवर परस्पर नाव लावून संगनमताने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गावातील एकासह वादग्रस्त व बडतर्फ उपजिल्हाधिकारी (भूसुधार) नरहरी रामभाऊ शेळके अशा दोघांवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुजमा पि. खिलीख जमा (वय 42 वर्षे, रा. शहंशाहनगर, बीड) यांनी अंभोरा पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून ख्वाजामियाँ मकबूल सय्यद (रा. देविनिमगाव, ता.आष्टी) व बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीनिमगाव येथे मशिदीची सर्व्हे नंबर-132मध्ये 15 हेक्टर 98 आर निजाम काळापासून इनाम जमीन आहे. गाव नमुना क्रमांक 9 मध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये ‘मशिद इनाम देवस्थान’अशी नोंद असून खासरा पाहणी पत्रकामध्ये ‘जमीन इनाम वर्ग-3’ असा उल्लेख आहे. जमिनीची देखरेख करणारे परंपरागत अर्चक सय्यद मोहिद्दीन शहाबोद्दीन व सय्यद अकबरअली दादाभाई (दोघे रा. देविनिमगाव) यांची प्रत्येकी 0-8-0 आणे अशी नोंद आहे. (Crime In Beed)

दरम्यान, अभिलेखात नोंदणीकृत वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे व मशिदीचे नाव कमी होऊन अचानक बेकायदेशीरपणे ख्वाजामियाँ मकबूल सय्यद याचे नाव लागल्याचे निदर्शनास आले. याबाबत सय्यद आरीफ युसूफ (रा. देविनिमगाव, हल्ली रा. शांतीविहार, गुलमोहर रोड, सावेडी, नगर) यांनी 14 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला. त्यावरून खातरजमा केली असता जमिनीच्या अर्चकांच्या संमतीपत्राविना प्रशासनातील अधिकार्‍याशी संगमनत करून जमिनीवर ख्वाजामियाँ सय्यद याने आपले नाव लावल्याचे पुढे आले. त्यावरून बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके व ख्वाजामियाँ मकबूल सय्यद यांच्यावर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेळकेचा आणखी एक कारनामा उघड

देवस्थान जमिनीचे ख्वाजामियाँ मकबूल सय्यद याने बनावट दस्तऐवज तयार करून खोटे शिक्के व सह्या मारल्या. वक्फ बोर्डाची जमीन बेकायदेशीररित्या खालसा करुन स्वत:च्या नावे केली. या कामी वादग्रस्त व बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याने 27 फेब्रुवारी 2018 रोजी आदेश काढल्याचे उघड झाले. या जमिनीचे मूल्य कोट्यवधी रुपये असून, शेळकेचा आणखी एक कारनामा या प्रकरणाने उघड झाला आहे. संगनमत करून व दोघांनी कट रचून बनावट दस्तऐवज तयार केले. स्वतःच्या फायद्यासाठी मशीद देवस्थानची (वक्फ बोर्ड) व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेळकेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा
फक्त ८४ हजारात खरेदी करा २ लाखांची KTM 200 Duke स्पोर्ट्स बाईक

काय आहे नियम?

सन 1995 च्या वक्फ कायद्यान्वये देवस्थान जमिनीची बेकायदेशीर खरेदी अथवा विक्री झाल्यास वक्फ संशोधन अधिनियम-2013 मधील कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. देवीनिमगावातील मशिदीची जमीन निजामकाळापासून असून, परंपरागत अर्चक म्हणून सय्यद मोहिद्दीन शहाबोद्दीन व सय्यद अकबरअली दादाभाई देखरेख करत होते. त्यांचे नावही मालक म्हणून नव्हे तर अर्चक म्हणून असते. देवस्थान जमीन स्वतःच्या नावावर करणे कायद्याने गुन्हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com