जनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या

पिशाेर ः पाेलिस ठाण्यात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी.
पिशाेर ः पाेलिस ठाण्यात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी.

पिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या आवळल्या. जनावरे चोरणारे संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनावरांच्या चोरीसोबत इतर चोरीच्या घटनांत वाढ झाली होती.

करंजखेडा (ता. कन्नड) येथील रोहिदास हिरामण काजने यांनी पिशोर पोलिस ठाण्यात ता. तीन मे ते चार मे दरम्यान बारा हजार रुपये किमतीची जनावरे चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. पिशोर पोलिसांना रात्री गस्तीदरम्यान चिंचोली लिंबाजी येथे एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग केला असता चोरट्याने वाहन व जनावरे बोरगाव (ता. सिल्लोड) येथे सोडून पोबारा केला होता.


पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरखेडा, डोंगरगाव, चिमणापूर, पिशोर येथून गेल्या काही दिवसांपासून ठराविक कालावधीत जनावरे चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. ऐन मशागतीच्या वेळी बैल आणि इतर दुभती जनावरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिससुद्धा सदर चोरीच्या घटना रोखण्यास अपयशी ठरत होते.ग्रामीण भागात सतत जनावरे चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी फौजदार संदीप साळुंके, पोलिस कर्मचारी यांचे पथक स्थापन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

सदर पथकाने खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. त्यावरून तपास करून शेख इरफान शेख इसा (वय 32, रा. अब्दलशानगर, सिल्लोड) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर गुन्हे त्याचे साथीदार शोएब उर्फ मोट्या बशीर शेख (रा. ईदगाह, सिल्लोड), इब्राहिम खान उर्फ मौल्या उस्मान खान (रा. अब्दलशानगर, सिल्लोड), इमीन बशीर कुरेशी (रा. अब्दलशानगर, सिल्लोड) यांच्यासह केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील चोरलेली जनावरे शेख मुजीब नसीर (गल्ली क्रमांक चार, कैसर कॉलनी, औरंगाबाद) यास विक्री केली असल्याची माहिती दिली. सदर संशयितांच्या ताब्यातून जनावरे विक्री केलेले पन्नास हजार रुपये, पंधरा हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांनी करंजखेडा, पिंपरखेडा, डोंगरगाव, चिमणापूर, पिशोर आदी ठिकाणांहून गाय, बैल, गोऱ्हे, म्हैस आदी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयितांना पुढील तपासासाठी पिशोर पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, संदीप साळुंके, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, नदीम शेख, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com