गोळीबार करून पाच जणांना पकडले

Caught 5 people in nanded after firing
Caught 5 people in nanded after firing

नांदेड : एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या पाच गुन्हेगारांच्या दिशेने गोळीबार करून त्यांना अटक केली. गुन्हेगारांनीही प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर गोळीबार केला. मात्र घेराव घालून बुधवारी (ता. ११) पहाटे दोन वाजता पाच जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आले असून चार जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक काडतूस, खंजर, व इतर साहित्य जप्त केल्याची महिती उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील यांनी दिली. 

अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या. यावरून गुन्हेगारांची धरपकड सुरू आहे. मंगळवारी (ता. १०) रात्री अकराच्या सुरामास गोवर्धनघाट पुलावरून एका दुचाकीवर तिघेजण संशयास्पद गस्तीवर असलेल्या पोलिसांना दिसले. त्यांचा पाठलाग केला असता ते जुना कौठा परिसरातील आरंभ सिटी चौकातून पुढे असर्जन चौक ते हस्सापूर रस्त्यावर थांबले. त्या ठिकाणी त्यांचे अन्य साथिदार असे नऊ जण थांबले होते. यावेळी स्थागुशाचे सहाय्यक निरीक्षक सुनिल नाईक यांनी गुन्हेगारांच्या दिशेने बुधवारी (ता. ११) पहाटे दोनच्या सुमरास गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल गुन्हेगारांनीही पोलिसांवर गोळीबार केला. मात्र सुदैवाने यात कुठलीच जिवीत हाणी झाली नाही.

पोलिसांनी घेराव घालून इंद्रपालसिंग उर्फ सन्नी तिरतसिंग मेजर (वय २९ रा. चिखलवाडी), हरदिपसिंग उर्फ सोनु उर्फ पिनीपाना सतनामसिंग बाजवा (३० रा. शहीदपूरा) राजूसिंग नानकसिंग सरदार (वय ३२ रा. असर्जन), सय्यद सलीम सय्यद रशीद (वय २१ रा. असरफनगर) आणि नागराज उर्फ लाल्या राजू चव्हाण (वय २७) यांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक जीवंत काडतुस, दुचाकी (एसएच२६-एक्यु-३४३८), खंजर व दोरी जप्त केली. घटनास्थळावरून चार जण पसार झाले. सुनील नाईक यांच्या फिर्यादीवरून या पाच जणांसह पसार झालेल्या चार जणांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दरोडा, आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शेख जावेद करीत आहेत. यावेळी पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com