औरंगाबादच्या व्हिडीओकॉनमध्ये सीबीआयची झाडाझडती सुरुच 

मनोज साखरे 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

औरंगाबाद : आयसीआयसीआय बॅंकेकडून व्हिडीओकॉनला देण्यात आलेल्या कर्जवाटप प्रकरणी औरंगाबादेतील चितेगावस्थित व्हिडीओकॉन कंपनीत सीबीआयने गुरुवारी (ता. 24) छापा घातला. सकाळपासून सीबआयचे पाच सदस्यीय पथक समुहाच्या आर्थिक व्यवहाराबाबत पडताळणी करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

सीबीआयने व्हिडीओकॉन व नूपॉवर रिन्युएबलच्या कार्यालयांवर गुरुवारी एकाचवेळी छापेमारी सुरु केली. त्यात औरंगाबादेतील चितेगावस्थित व्हिडीओकॉन कंपनीचाही समावेश आहे. सीबीआयच्या पाच सदस्यीय पथकाने सकाळी छापा घातला व त्यांनी कंपनी कार्यालयातील अकाऊंट विभाग ताब्यात घेतला. त्यानंतर कंपनीच्या व्यवहाराबाबतची सर्व कागदपत्रे पथकाने हस्तगत करुन त्याची पडताळणी व तपासणी सुरु केली आहे. यात काहींची चौकशीही केली जात आहे. विशेषत: छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

कंपनीत प्रवेश करणाऱ्याबाबत नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षक माहिती देतात. परंतु गुरुवारी छापेमारीनंतर सुरक्षारक्षकांकडून फोनवरुन दिल्या जाणाऱ्या माहितीलाही कंपनीतून प्रतिसाद दिला गेला नव्हता. अर्थातच सीबीआयच्या पथकाकडून आतील संपर्क यंत्रणाही बंद करण्यात आली तसेच अकाऊंट विभागाची झाडाझडती सुरु असल्याने या विभागाशी सलग्न कर्मचाऱ्यांना सुटीही देण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली. 

Web Title: CBI still scrutinized in Videocon of Aurangabad

टॅग्स