सीसीटीव्ही : गुलेरने काच फोडून अशी करायचे बॅग लिफ्टिंग 

मनोज साखरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

गुलेरद्वारे वाहनाच्या काचेला छिद्र पाडण्याची अनोखी मोडस टोळीच्या कामी येत होती. एकदा छिद्र पडले की, पाठलाग करुन नंतर त्याच काचेवर प्रहार करायचा व लुट करायची अशी कृतीही या टोळीकडून केली जात होती.

औरंगाबाद - पैसे घेऊन जाणारी व्यक्ती निश्‍चित झाल्यानंतर बॅग लिफ्टर त्या व्यक्तींची कार हेरायचे. त्यांनी तयार केलेल्या खास गुलेरमधून छर्रा मारुन लक्ष्य निश्‍चित केलेल्या व्यक्तीच्या वाहनाची काच फोडायची. विशेष म्हणजे याचा आवाजही येत नव्हता आणि छर्ऱ्याच्या आकाराचेच काचेला छिद्र पडायचे. त्यानंतर काच फोडणे सोपे जायचे, अशी मोडस वापणाऱ्या टोळीकडून चार गुलेरही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

गुलेरद्वारे वाहनाच्या काचेला छिद्र पाडण्याची अनोखी मोडस टोळीच्या कामी येत होती. एकदा छिद्र पडले की, पाठलाग करुन नंतर त्याच काचेवर प्रहार करायचा व लुट करायची अशी कृतीही या टोळीकडून केली जात होती. विशेषत: त्यांच्याकडे स्क्रु ड्राईव्हर व टी शेपची अवजारे सापडली आहेत. 

येथे मारला एवढ्यांचा डल्ला 

 • 1 मार्च -क्रांतीचौक भागात दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख लंपास 
 • 5 मार्च -वेदांतनगर भागात डिक्कीतून एक लाख रुपये लंपास 
 • 6 नोव्हेंबर -जिन्सी भागातून दुचाकीच्या डिक्कीतून 50 हजारांची चोरी. 
 • 7 नोव्हेंबर - सिडको भागात कारची काच फोडून दोन लाख 50 हजारांची चोरी. 
 • 13 नोव्हेंबर -वाळुज भागात दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास. 
 • 20 नोव्हेंबर -सिडको पोलिस ठाणे हद्दीत कारची काच फोडून दोन लाख 18 हजार रुपये लंपास. 
 • 7 डिसेंबर -जवाहरनगर भागात कारची काच फोडून दीड लाख लंपास. 

Image may contain: 1 person, indoor

चोरीसाठी यायचे शहरात 

टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लुटीचे प्लॅन आखीत होती. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणुन दोन घरे त्यांनी भाड्याने घेतली होती. पैठण येथून औरंगाबाद शहरात येत ते महत्वाच्या बॅंकासमोर व आत ठाण मांडून बसत होते. काम फत्ते झाल्यानंतर मात्र ते कोठेही न थांबता वेगवेगळ्या वाहनांनी परत पैठणला जात होते.  

No photo description available.

  दुचाकीही केल्या चोरी 

  संशयितांनी बॅग लिफ्टिींगसाठी काही दुचाकीही चोरी केल्याचे समोर आले आहे. या दुचाकीचा ते गुन्ह्यासाठी वापर करायचे. बीड, सातारा, सोलापूर भागातही त्यांनी लुट केली असून त्यांच्याकडून पाच दुचाकींसह सुमारे पंचवीसपेक्षा जास्त मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

  हेही वाचा : सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगणा अटकेत 

  हेही वाचा : खळबळजनक : मोदींची सेफरुम होती सुपारी बहाद्दराच्या जागेत 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: CCTV Footage of Bag Lifting in Aurangabad