वटवृक्षाची लागवड करुन वटपौर्णिमा साजरी

सणानिमित्त सुवासिनींच्या आनंदाला उधाण आले होते. दागदागीने लेऊन व मराठमोळी वस्त्रपरिधान करुन सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पुजा केली. व वटवृक्षाला सात फेरे घालून अखंड सौभाग्यासाठी साकडे घातले.
वटवृक्ष लावून पौर्णिमा साजरी
वटवृक्ष लावून पौर्णिमा साजरी

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : महिलांच्या आनंदाचा सण असलेला वटपौर्णिमा हा गुरुवारी (ता. २४) शहरासह ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

सणानिमित्त सुवासिनींच्या आनंदाला उधाण आले होते. दागदागीने लेऊन व मराठमोळी वस्त्रपरिधान करुन सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पुजा केली. व वटवृक्षाला सात फेरे घालून अखंड सौभाग्यासाठी साकडे घातले. घरोघरी गोडधोड जेवणाचा बेत आखला होता.

हेही वाचा - तौक्तेसारख्या वादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत

या सणाचे औचित्य साधून तालुक्यातील पांगरी येथील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी मुख्याध्यापक के. सी. घुगे यांच्या प्रेरणेने मैनापूरी देवस्थानच्या परिसरातील माळरानावर वडाच्या झाडाची रोपे लावून वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. एकीकडे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत असतांना पांगरी शाळेच्या शिक्षिकांनी राबविलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय म्हणावा लागेल.

या उपक्रमासाठी झाड फाउंडेशनचे सदस्य अॅड. माधव दाभाडे, साई देशमुख यांनी सहकार्य केले. याप्रसंगी मुख्याध्यापक के. सी. घुगे, शिक्षिका अल्का खिल्लारे, श्रद्धा शेंडे, सुनंदा जाधव, शिवगंगा जांभळे, रुपाली नागरगोजे, सहकारी शिक्षक राजेश सातपुते व डी. एस. सावंत उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com