लातुरात बकरी ईद उत्साहात साजरी

हरी तुगावकर
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

`ये अल्लाह केरळ में सैलबासे परेशान भाईयोंपर रहेम अता फर्मा...` अशी दुआ हजारो मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे मागितली. येथील ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. 22) बकरी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आला. जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट करीत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
 

लातूर- `ये अल्लाह केरळ में सैलबासे परेशान भाईयोंपर रहेम अता फर्मा...` अशी दुआ हजारो मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे मागितली. येथील ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. 22) बकरी ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आला. जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट करीत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

येथील, इदगाह मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमा होण्यास सुरवात झाली होती. सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान, मौलाना मुफ्ती सोहेल यांनी नमाज अदा केली. कुराणाचे पठण तौफीक कायमखानी यांनी केले. विश्वशांतीसाठी यावेळी अल्लाहकडे दुआ मागण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पूरामुळे निसर्गरम्य केरळ उद्धवस्त झाले आहे. शेकडो मृत्यूमुखी पडले आहेत. `ये अल्लाह केरळ में सैलबासे परेशान भाईयोंपर रहेम अता फर्मा...` अशी दुआही अल्लाहकडे मागण्यात आली. केरळमधील नागरीक या संकटातून लवकर उभारी घेवोत अशी प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून अल्लाहकडे दुआ मागितली. यावेळी केरळ पुरग्रस्तांसाठी मदत निधीचे संकलनही करण्यात आले. यावेळी आमदार अमित देशमुख, महापौर सुरेश पवार, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रो़डगे, तहसिलदार संजय वारकड, महापालिकेतेली विरोधी पक्ष नेते अॅड. दिपक सूळ, नगरसेवक अशोक गोविंदपूकर, सचिन बंडापल्ले आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Celebrating Badak Eid in Latur