सावे यांच्या राज्यमंत्रीपदाच्या शपथनंतर औरंगाबादेत जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

अतुल सावे यांनी शपथ घेताच शहरात ठिकाठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जाल्लोष साजरा करण्यात आला.

औरंगाबाद : बहुचर्चित राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी (ता. 16) मोठ्या थाटात पार पडला. या विस्तारात औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वीस वर्षांपासून एक निष्ठेने केलेली कामाची आज त्यांना पावती मिळाली. दरम्यान सावे यांनी शपथ घेताच शहरात ठिकाठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जाल्लोष साजरा करण्यात आला. 

जवळपास वर्षभरापासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु होती. अनेकदा मुहूर्त ठरले, मात्र विस्तार झाला नाही. ज्या-ज्या वेळी विस्ताराचा प्रश्‍न निघाला तेव्हा औरंगाबादेतून आमदार अतुल सावे यांचा नाव पुढे आले. यावेळी आमदार सावे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शपथ घेईपर्यंत सांगता येत नाही, असे अतुल सावे यांनी सांगितले होते. शनिवारी (ता. 15) विस्तारात तुमचे नाव आहे. मुंबईला या असा फोन आला. रविवारी आमदार सावे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्योजक ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला आहे. 

आमदार सावे बजरंग चौक, औरंगपुरा आणि पुंडलिकनगरातील कार्यालयाबाहेर सावे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांतर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार सावे यांचे नाव मंत्रीमंडळाच्या विस्तारात जाहिर होताच सोशल मिडियावर शुभेच्छाचा वर्षांव सुरु झाला. व्हॉटसअॅप,फेसबुक सह विविध ठिकाणी सावे यांना शुभेच्छा देणारे फलक झळकविण्यात आले. सर्वपक्षयांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे आणि सामाजिक व नागरिकांच्या प्रश्‍नाबाबात जागरुक असलेले आमदार सावे यांची निवडीचे सर्वसामन्यातून स्वागत होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration in aurangabad after Atul Save took oath as state minister