देवगाव रंगारी येथे मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्याने जल्लोष     

संतोष गंगवाल
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

देवगाव रंगारी - मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात गुरुवारी (ता.२९) विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवगांव रंगारी (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज, भाजप व शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष व्यक्त करुन आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ व सर्वपक्षीय आमदारांचे आभार मानले.

यावेळी भाजपाशचे अजबसिंग राजपूत, सुभाष सोनवणे, पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, काकासाहेब सोनवणे, प्रकाश नाईक, सोमनाथ बरबंडे, राजु सोनवणे, बंटी सोनवणे, गणेश मुंढे, दत्तात्रय सोनवणे, सागर महाले, आसीफ पठाण, प्रदीप दिवेकर, दिपक सोनवणे, बाळु पोपळघट यांच्यासह समाज बांधव, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: celebration due to the approval of the Maratha Reservation Bill at Devgaon Rangari,