आई तुळजाभवानी मातेचे सिमोल्लंघन

tulajapur
tulajapur

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या सिमोल्लंघन शुक्रवारी (ता.19) पहाटे उत्साहात पार पडले. 

नगर येथून आलेल्या पलंग आणि पालखीचे आगमन येथे झाल्यानंतर गुरूवारी (ता.18) पलंग पालखीची मिरवणूक मध्यरात्री निघाली. त्यावेळी तुळजाभवानी मातेची रात्री बारा वाजता नित्योपचार अभिषेक पुजा करण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानी मातेस 108 साड्यांनी दिंड बांधण्यात आले. नगर येथून आलेल्या पलंग आणि पालखीचे पहाटे चार वाजता तुळजाभवानी मंदीरात आगमन झाले. आई राजा उदोउदो च्या गजरात तसेच संबळाच्या निनादात तुळजाभवानी मातेचे सिमोल्लघंन पार पडले. तुळजाभवानी मातेचे भोपे पुजारी सचिन बुबासाहेब कदम पाटील हे आजच्या पुजेचे भोपे पुजारी होते.

पालखीचे मानकरी जितेंद्र भगत, विजय भगत, शिरीष भगत, तसेच पलंगाचे मानकरी गणेश पलंगे, मायमोरताबचे मानकरी क्षिरसागर, छत्रीचे मानकरी कैलास डांगे, दिवटीबुधलीचे मानकरि राम सुतार आदीसह उपस्थित होते. सिमोल्लघंन झाल्यानंतर तुळजाभवानी मातेस साखरभाताचे नैवेद्य, करंज्याचे, नैवेद्य दाखविण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, तुळजा भवानी मातेचे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com