केंद्र व राज्य सरकार सामाजिक विषमता वाढवित आहे: शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात मराठा युकांनी आत्महत्येचे सत्र सुरू केले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून ह्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी आमदार जाधव यांनी सुरु केलेली ‘मराठा युवा मन परिवर्तन समुपदेश यात्रा' नांदेडात आल्यानंतर विश्रामगृहात ते बोलत होते. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थिती आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

नांदेड : देशाला संविधानाने एकसंध ठेवले असतांना केंद्र व राज्य सरकार विविध जाती धर्माच्या नावाखाली देशात सामाजीक विषमता वाढवित असल्याचा घणाघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता. 12) आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठवाड्यात मराठा युकांनी आत्महत्येचे सत्र सुरू केले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून ह्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी आमदार जाधव यांनी सुरु केलेली ‘मराठा युवा मन परिवर्तन समुपदेश यात्रा' नांदेडात आल्यानंतर विश्रामगृहात ते बोलत होते. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थिती आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मराठा समाजाने राजकीय दबाव टाकण्यासाठी व्होट बँक तयार करणे गरजेचे आहे. मराठा नेत आणि समाज या दोन परस्पर विरूध्द बाजू झाल्याने नेत्यांना फक्त पक्षाची तिकीट लागतात. मात्र समाजाला आरक्षण पाहिजे.

सरकार मराठा युवकांच्या किती आत्महत्येची वाट पाहत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. वाळूज औरंगाबादची दंगल ही कामगार पुरविणाऱ्या काही कंत्राटदाराने केल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्ली येथे संविधान जाळणाऱ्याविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना फाशी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रा. चंद्रकांत भराट, डॉ. इशा झा, डॉ. विकास तांगडे आणि डॉ. शाम पाटील यांच्यासह पंजाब काळे, संतोष गव्हाणे, माधव देवसरकर, भागवत देवसरकर आदी उपस्थित होते.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Center and state government are increasing social inequality says Shivsena MLA Harsh Vardhan Jadhav