केंद्र व राज्य शासनाचा वीज ,पाणी आणि खोलीकरणावर भर

Center and state government emphasis on electricity, water and depth
Center and state government emphasis on electricity, water and depth

फुलंब्री :  केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व रस्त्याच्या कामांचा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व दानवे यांच्या हस्ते शुभारंभ सोमवारी (ता.25) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथरीकर, माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, बाजार समितीचे तज्ञ संचालक विलास उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

दानवे म्हणाले, कीनगावकरांनी कमी पैशात चांगले दर्जेदार कामे केलेली आहे. रस्त्यामुळे आपल्या भागाचा विकास होत असल्याने केंद्र व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे. भाजप सरकार सर्वसामान्य नागरिकांचे हीत जोपासणारे आहे. तसेच गावातले पाणी गावाच्याच शिवारात जिरविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवारची योजना अंमलात आणली आहे. 

यावेळी मार्गदर्शन करतांना बागडे म्हणाले की, आपल्या गावातील दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. आपल्या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. भाजप सरकारने टोलमुक्त महाराष्ट्र केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्यात आले. काँग्रेसच्या काळात केवळ 700 कोटी रुपयांचा पीकविमा मिळाला होता. यंदा सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच कल्याण चव्हाण यांनी केले.  याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष डॉ.सारंग गाडेकर, उपसभापती एकनाथ धटिंग, सांडू जाधव, नाथा काकडे, संजय त्रिभुवन, अप्पासाहेब काकडे, रत्नाकर म्हस्के, सुशीला फुले, सविता फुके, नरेंद्र देशमुख, कैलास सोनवणे, प्रफुल शिंदे, सरपंच पांडुरंग नजन, प्रशांत भदाणे, कौशल्या जंगले, मयूर जाधव, मनोहर सोनवणे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काँग्रेसच्या रत्नाकर म्हस्केचा भाजपात प्रवेश 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार  रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले रत्नाकर म्हस्के यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रत्नाकर म्हस्के यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस पक्षासोबत राहून लढविली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com