संकटग्रस्त महिलांना सखी केंद्राचा आधार

जालना : संकटग्रस्त महिलांसाठी कार्यरत असलेले सखी निवारा केंद्र.
जालना : संकटग्रस्त महिलांसाठी कार्यरत असलेले सखी निवारा केंद्र.

जालना - समाजातील अन्याय, अत्याचाराने पीडित महिलांना सखी केंद्राचा आधार मिळत आहे. तीन महिन्यांत ४८ महिलांनी मदतीसाठी सखी केंद्राकडे धाव घेतली. या सर्वांना आवश्‍यक ती मदत करून  १९ प्रकरणांत केंद्रातील तज्ज्ञानीं तडजोड घडवून आणून  तुटणारे संसार जोडण्याचा तसेच संकटग्रस्त महिलांना निवारा देऊन कायदेशीर मदत केली आहे.

कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त, फसवणूक, अत्याचार झालेल्या पीडितांना, बालविवाहाला बळी पडलेल्या महिलांना  एकाच छताखाली आवश्‍यक उपचार व मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सखी केंद्राची  (वन  स्टाॅप क्रिसिस सेंटर) सुरू केले. 
जिल्ह्यातील महिलांसाठी तीन महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर हे  केंद्र  सुरू झाले  आणि संकटग्रस्त महिलांना अडचणीच्या काळात तास हक्काचा निवारा आणि  आवश्‍यक ती मदत मिळू लागली आहे.

सखी केंद्रात मिळणाऱ्या सेवा
कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत महिलांना न्यायालयात अर्ज करून संरक्षण, नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केंद्रातर्फे मदत व साहाय्य. अत्याचार व फसवणूक झालेल्या महिलांना तत्काळ उपचार, आर्थिक साहाय्य व मदत मिळवून देणे. परिस्थितिनुरूप अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना आर्थिक मदत व रुग्णालयात मोफत उपचार. पोलिस ठाण्यासंदर्भात लागणारी कायदेशीर मदत व मानसिक  समुपदेशन या सेवा केंद्रातर्फे पुरविल्या जातात.

हिंसाचाराच्या मुळाशी संशयी वृत्ती आणि व्यसनाधिनता 
पतीच्या संशयी वृत्ती व व्यसनाधिनातेमुळे बऱ्याच महिला हिंसाचाराला बळी पडत असल्याचे सखी केंद्रात येणाऱ्या प्रकरणावरून निदर्शनास आले आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे चारित्र्यावर संशय घेण्याच्या घटनांचा यात समावेश आहे. त्यामुळे व्यसनाधिनात आणि मोबाईलचा अतिवापर या दोन प्रमुख गोष्टी कौटुंबिक हिंसाचाराच्या मुळाशी असल्याचे सखी केंद्राच्या व्यवस्थापक विद्या लंके यांनी सांगितले.

संकटग्रस्त महिलांना चोवीस तास तत्काळ मदत उपलब्ध करून दिली जाते. यासाठी  कायदेशीर सल्लागार, समुपदेशक, पोलिस संरक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती केंद्रात केलेली आहे.  अन्याय व अत्याचारग्रस्त महिला ९४२२२६१५१६ या क्रमांकावर संपर्क करून आवश्‍यक ती मदत मिळवू शकतात. - विद्या लंके
व्यवस्थापक,सखी केंद्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com