दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

बीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यामुळे दुष्काळाची वस्तस्थिती पाहण्यासाठी पथक मराठवाड्यात आले असून आज गुरुवारी (ता. सहा) दुपार नंतर तीन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात येत आहे. 

मात्र, पथकाच्या वेळापत्रकाकडे नजर मारल्यानंतर हा दौरा जणू एखादी बुलेट ट्रेन वाटावी असाच असून दोन तास 50 मिनीटांच्या वेळेत पथक 142 किलोमिटर अंतर पार करुन तीन तालुक्यांतील चार गावांत पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही वेळ माजलगावच्या शासकीय विश्रागृहात राखीव देखील आहे. प्रत्येक गावांत दहा मिनीटांत पथक दुष्काळाची काय पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कशा, जाणणार असा प्रश्न आहे. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा समावेश असून पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर सोबत असतील.

पथक दुपारी परभणी जिल्ह्यातून जिल्ह्यात येऊन रेवली (ता. परळी), खडकी (ता वडवणी) व बीड तालुक्यातील जरुड आणि कांबी या दोन गावांत भेटी देऊन पाहणी करणार आहे. पथकाच्या वेळापत्रकात प्रत्येक गावांसाठी दहा मिनीटांचा वेळ आहे. दरम्यान, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार व गेवराई या तिव्र दुष्काळी तालुक्यांना पाहणीतून वगळल्याने टिका होत आहे.

Web Title: central squad in beed for observing drought