सीईटी परीक्षा 11 मे रोजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

परभणी - राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा 11 मे 2017 रोजी घेण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी जाहीर केले. 

राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित खासगी, स्वायत्त (ऍटोनॉमस) अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त (सीईटी सेल) यांच्या वतीने सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार 2017-18 शैक्षणिक वर्षाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी 11 मे 2017 ला सीईटी होईल. सीईटी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. परीक्षेसंदर्भातील माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे डॉ. महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: CET exam on May 11