25 वर्षे बाळासाहेबांसोबत राहिलो, आता पडद्यावर पाहणार: भुजबळ 

Chagan Bhujbal
Chagan Bhujbal

औरंगाबाद : शिवसेनेत असताना पंचवीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलंय, त्यांच्यासोबत राहिलोय. आता त्यांच्या जीवनावर 'ठाकरे' चित्रपट येतोय, यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका कशी वठवली हे पाहण्याची उत्सूकता आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रा आणि इतर कार्यक्रमातून सवड काढून 'ठाकरे' पाहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. 

आपल्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्ष शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर 'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण 'ठाकरे' पाहणार असल्याचे सांगितले. 

आपल्या राजकीय जीवनातील पंचवीस वर्ष शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर 'ठाकरे' चित्रपटाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. भुजबळ म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय जीवन, शिवसेनेच्या उभारणी दरम्यान झालेली मांडणी पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com