औरंगाबाद : 15 एप्रिलला निवडला जाणार जिल्हा बँकेचा अध्यक्ष

प्रकाश बनकर
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे; उपाध्यक्षपद भाजपकडे

- नितीन पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता.

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आत्महत्या केली. त्यामुळे रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 15 एप्रिलला विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतून बँकेचा नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. याविषयी बँकेच्या सर्व संचालकांना बैठकीविषयी पत्राव्दारे कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेंडे यांनी शुक्रवारी (ता.5) दिली. 

दिवंगत सुरेश पाटील यांचे पुत्र माजी आमदार नितीन पाटील यांना सहानुभूती म्हणून अध्यक्षपदाची जाबाबदारी देण्याबाबत काहीजण हालचाली करीत आहेत. महिनाभरापासून त्यांच्याच नावाची चर्चा सध्या सुरु आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे पुणे येथील सचिव यांना विभागीय सहनिबंधकाकडून बँकेच्या अध्यक्षपद रिक्‍त विषयीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

अध्यक्षाची निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेंडे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 3 एप्रिलला अध्यक्षपदाची निवड करण्याचे आदेश आले. बँकेच्या संचालक मंडळावर जेवढे लोक निवडून आले ते या बैठकीतून नवा अध्यक्ष निवडणार आहे. 

नितीन पाटील यांच्या नावासाठी काँग्रेसकडून काही संचालकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सुरेश पाटील गेल्यानंतर काही दिवसांपासून या पदासाठी चढाओढ सुरु झाल्या. बँकेची मुदत एक वर्षाची असल्यामुळे सध्या उपाध्यक्ष व इतर लोकांच्या माध्यमातून काम चालवावे अशी काहीची इच्छा आहे. सर्व काही नियमानुसार व्हावेत असेही सांगणारा एक गट आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष हे सहकारी क्षेत्रातील महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदावर भाजप आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा डोळा आहे.

बँकेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे; तर उपाध्यक्षपद भाजपकडे असे गणित होते. अध्यक्षांच्या रिक्‍त जागेमुळे सध्या या पदाचा प्रभार उपाध्यक्षांकडे आहे; दरम्यान, या पदावर नितीन पाटील यांची वर्णी लागणार, की कॉंग्रेस-भाजपचा संचालक विराजमान होणार हे 15 एप्रिलनंतर स्पष्ट होईल

Web Title: Chairman of the Aurangabad District bank will be selected on April 15