esakal | जिल्हाभरात २१ सप्टेंबरपासून 'चक्का जाम' आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

जिल्हाभरात २१ सप्टेंबरपासून 'चक्का जाम' आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी आता ता. २१ सप्टेंबर २०२१ पासून जिल्हाभर तालुक्याच्या ठिकाणी 'चक्का जाम' आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी (ता.१३) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी (ता. १३) बी. रघुनाथ सभागृहात खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक झाली. ता. १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली जाणार आहे.

हेही वाचा: कनेरगावात ग्रामीण बँक मित्राची दोन लाखाची बँग चोरीला

त्याच दिवशी जिल्ह्यिातील सर्व ग्रामपंचायतीच्यावतीने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे' अशा आशयाचे ठराव तहसीलदारांमार्फत शासनाला सादर केले जाणार आहेत. बैठकीस खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, विजय वाकोडे, प्रताप देशमुख, भगवान वाघमारे, विजय जामकर, किर्तीकुमार बुरांडे, विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, सय्यद खादर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, सचिन देशमुख, टिकाखान, वासिम भाई, बाळासाहेब फुलारी, गोविंद अजमेरा, धोंडी खाकरे, पप्पू वाघ, अरुण चव्हाळ, महेश पाटील, रामप्रसाद रणेर, प्रदीप भालेराव, सुभाष माने आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: लातूर : वीस वर्षीय तरुणाचा सीना नदीत गणेश विसर्जन करताना मृत्यू

"ता. २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. ता. २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीच्या दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे. दररोज एका तालुक्याच्या वतीने याप्रमाणे सलग ९ दिवस हे साखळी उपोषण केले जाणार आहे. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे."
- संजय जाधव, खासदार, परभणी

loading image
go to top