Corona Update : चाकूरातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या पत्नी, दोन मुलांसह चार जणांना कोरोना

download.jpg
download.jpg

चाकुर (लातूर) : ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील
पत्नी, दोन मुलाला व अन्य एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल शुक्रवारी (ता. १०) पॉझिटिव्ह आला असून तालूक्यात कोरोनाबाधीताची संख्या दहा झाली आहे. 

ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याला ३० जून रोजी कोरानाची लागण झाली आहे, सदरील कर्मचाऱ्याला रुग्णालयात कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती, वैदयकीय अधिकारी, कर्मचारी व इतर २२ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यातील सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर ते निगेटिव्ह आले होते. 

यापैकी एका आरोग्य कर्मचाऱ्याला काही दिवसापासून अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याचा स्वॅब दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आला. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तसेच त्याच्या कुटुंबातील पत्नी, तीन वर्षे व एक वर्ष वयाची मुले या तिघांचे अहवाल दुसऱ्या तपासणीत पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिली.

 पत्नी व दोन मुलांना चाकूर येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये व आरोग्य कर्मचाऱ्यावर लातूर येथे उपचार केले जात असल्याची माहिती वैदयकीय अधिक्षक डॉ. दिपक लांडे यांनी दिली. वडवळ नागनाथ, सुगाव, रोहिणा, नागेशवाडी, झरी या गावातील प्रत्येक एक व्यक्तीसह चाकूर येथील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे संख्या दहावर गेली आहे.

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com