करणी, भानामतीवरून महिलांशी अघोरी कृत्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

चाकूर - धनगरवाडी (ता. चाकूर) येथील दोन महिलांना करणी, भानामती झाली आहे, तुमच्यावर उपचार करतो म्हणून अघोरी कृत्य करीत त्याची चित्रफित व्हॉटस्‌ अपवर पसरवल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

धनगरवाडी येथील दोन महिलांना सोमवारी (ता.5) करणी, भानामती झाली आहे म्हणून उपचाराकरिता अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. महिलांना जमिनीवर झोपवून हाताला, पायाला व केसांना पकडून मारहाण केली, अघोरी कृत्य करीत महिलांना शेण खाण्यास प्रवृत्त केले. पीडित महिलेकडून गावातील तिघांनी भानामती, करणी केल्याचे कबूल करून घेतले. याची चित्रफित तयार करून व्हॉट्‌सअपवर पसरविली.

या प्रकरणी माझ्या कुटुंबीयाची बदनामी करून जीवितास धोका निर्माण केला व अंधश्रद्धेचे संवर्धन केले, अशी तक्रार सोपान केरबा मुंडकर यांनी पोलिसांकडे केली आहे. यावरून प्रभाकर ऊर्फ बबन केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे, दगडू शेवाळे, कलुबाई कोरे यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: chakur marathwada news crime