चाकूर तालूक्याने दिला सहावा खासदार 

प्रशांत शेटे 
शुक्रवार, 24 मे 2019

चाकूर (लातूर) : देशाच्या राजकारणात वेगळी अोळख असलेल्या चाकूर तालूक्याने आज पर्यंत पाच खासदार लोकसभेत पाठविले असून या निवडणुकीतून सहावा खासदार म्हणून सुधाकर श्रंगारे यांना देशाच्या सर्वांच्या सभागृहात लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. 

चाकूर (लातूर) : देशाच्या राजकारणात वेगळी अोळख असलेल्या चाकूर तालूक्याने आज पर्यंत पाच खासदार लोकसभेत पाठविले असून या निवडणुकीतून सहावा खासदार म्हणून सुधाकर श्रंगारे यांना देशाच्या सर्वांच्या सभागृहात लातूर लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. 

'चाकूरकर' या नावामुळे चाकूर तालूक्याची देशात अोळख निर्माण झाली आहे, या छोट्याशा तालूक्याने आता पर्यंत पाच खासदार दिले असून आजच्या निवडणुकीत सुधाकर श्रंगारे यांच्या विजयामुळे सहावा खासदार मिळाला आहे. राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून या नेत्यांना अोळखले जाते. १९६२ साली लातूर लोकसभा मतदार संघातून चाकूरचे तुळशीराम कांबळे हे खासदार झाले यानंतर झालेल्या १९६७, १९७२ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवीला. नळेगाव (ता. चाकूर) येथील अॅड. टी. एस. श्रंृगारे यांनी १९७७ साली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवीला होता, पंतप्रधान चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी दळणवळण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

१९८० साली झालेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे चाकूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांना लोकसभेची संधी मिळाली. १९८० ते २००४ दरम्यान झालेल्या सात निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. या कालावधीत चाकूरकर यांनी केंद्रात लोकसभेच्या सभापतीपदापासून विविध खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. २००४ साली राज्यसभेचे खासदार म्हणून प्रतिनीधीत्व करीत देशाच्या गृहमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तुळशीराम कांबळे यांचे सुपुत्र अरविंद कांबळे यांनी १९८४,१९८९,१९९१ व १९९८ या निवडणुकीत विजय मिळवीत लोकसभेत उस्मानाबादचा खासदार म्हणून प्रतिनीधीत्व केले.

कडमुळी (ता.चाकूर) येथील संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणी मतदारसंघातून २०१४ सालच्या निवडणुकीत विजय मिळवीला तसेच अनेक वर्षे आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे. या मातब्बर नेत्यांच्या राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम २०१९ च्या निवणुकीत सुधाकर श्रंगारे यांच्या रूपाने पुढे आले आहे. घरणी (ता.चाकूर) येथील सुधाकर श्रंगारे यांना राजकारणाचा कोणताही गंध नसताना पहिल्यादा लढलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवीला यानतंर लोकसभेच्या निवडणुकीतून खासदार होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakur tehsil gives 6th MP to Latur