भाजप-शिवसंग्रामध्ये तोडगा निघण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी (ता 25) बैठक झाल्यानंतर भाजप-शिवसंग्रामधील तणाव निवळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा आणि राज्यातील आगामी भूमिका ठरविण्यासंदर्भात शिवसंग्रामचे संस्थापक तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी भूमिका घेतल्यानंतर मंगळवारी (ता. 25) मुख्यमंत्री आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी यांच्यात ही बैठक झाली.

शिवसंग्रामने जिल्हा परिषद सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून जिल्हा परिषदेमधील कारभार, शिवसंग्रामवर निधी वाटपात होणाऱ्या अन्यायाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या विषयात लक्ष घालण्याचा शब्द देत लवकरच जिल्हा परिषदेतील संबंधितांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे भाजप-शिवसंग्रामधील तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, आमदार भारती लव्हेकर, युवक प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, जिल्हाप्रमुख प्रभाकर कोलंडे, अशोक लोढा, भारत काळे, विजयकांत मुंडे, ज्ञानेश्वर कोकाटे, तुकाराम पवार उपस्थित होते. 

Web Title: chances of solution in between BJP and Shivsangram