फुलंब्री बाजार समितीच्या सभापतीपदी चंद्रकांत जाधव

नवनाथ इधाटे
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा दिल्याचे कळताच भाजपनेही समय सुचकता पाळून शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून साथ दिली. त्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांना 17 मतदान पडले तर त्यांच्या विरोधातील संगीता संतोष मेटे यांना केवळ एका मतावरच समाधान मानावे लागले आहे.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा दिल्याचे कळताच भाजपनेही समय सुचकता पाळून शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून साथ दिली. त्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांना 17 मतदान पडले तर त्यांच्या विरोधातील संगीता संतोष मेटे यांना केवळ एका मतावरच समाधान मानावे लागले आहे.

फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांनी दुसऱ्या सहकाऱ्याला संधी मिळावी म्हणून सभापती पदाचा राजीनामा दिला. सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना - भाजपने काँग्रेसच्या एका संचालकाला आपल्या तंबूत घेतले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीकडे नऊ तर भाजप शिवसेनेकडे नऊ उमेदवार राहिले. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत मतदानाच्या एक दिवस अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या सभापती पदाच्या उमेदवार संगीता संतोष मेटे भाजपच्या तंबूत गेल्या.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश करून सभापती पदाचा फ़ॉर्म भरला. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेला बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याने भाजपची कुचंबणा झाली.

त्यामुळे अर्ज माघारी घेण्याचा वेळ संपला होता. त्यामुळे भाजपच्या संचालकांनी समय सुचकता  दर्शवून शिवसेनेच्याच बाजून मतदान केले. एकंदरीत शिवसेनेच्या उमेदवाराला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या संचालकांनी मतदान करून एकजूट दाखविली. त्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत जाधव यांना 17 मते तर संगीता मेटे यांना केवळ एका मतावर समाधान मानावे लागले. चंद्रकांत जाधव यांची सभापती पदी निवड झाल्यानंतर काँग्रेस व त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Jadhav Elected Phulambri Market Committee Chairman