खासदार खैरैंनी आत्तापर्यंत पिठाची गिरणी तरी आणली का? - सतीश चव्हाण

राजेभाऊ मोगल
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - हिंदुत्वाच्या नावाने जनतेची मते लाटणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंनी आत्तापर्यंत जिल्ह्यासाठी पिठाची गिरणी तरी आणली का, असा सवाल उपस्थित करीत आमदार सतीश चव्हाण यांनी खैरेंना एका गावात, वॉर्डातदेखील सुधारणा करता आलेली नाही, अशी टिका केली. तसेच येथील लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटली तर खासदार खैरेंविरुद्ध लढेल, अशी घोषणाही त्यांनी केली. 

नागपूर येथे बुधवारपासून (ता. चार) विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. तीन) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार चव्हाण यांनी खासदार खैरे यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की हिंदुत्वाच्या नावाने मते मागणाऱ्या श्री. खैरे यांनी सांगता येणारे एकही विकास काम केलेले नाही. शेजारच्या जालना जिल्ह्यात जेएनपीटीचा राष्ट्रीय प्रकल्प आणला. खरे तर त्यासाठी औरंगाबाद जवळील दौलताबाद येथे चांगली जागा, सुविधा होत्या. मात्र, आपल्या खासदारांनी साधे आंदोलनही गेले नाही. अन्य राष्ट्रीय संस्था आणण्यासाठी तरी काय केले, याचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. हे सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे.

ज्या सोशल मिडीयाचा वापर करून सत्ता मिळविली तोच सोशल मिडीया त्यांच्यावर उलटणार आहे. शहरात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर बुडविण्याचा उद्योग चालविला आहे. महापालिका केवळ दहा टक्‍केच कर वसुली करीत आहे. जी मंडळी कर बुडविते त्यांची नावे जाहीर करायला हवीत, अशी मागणीही त्यांनी केली. 

खैरेंविरुद्ध लढण्यास मी कधीही तयार 
आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार यांच्या विरुद्ध लढण्यास आपली तयारी आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारता असता, आमदार चव्हाण म्हणाले, ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटली तर मी कधीही खैरेंविरुद्ध लढण्यास तयार आहे. आता लोकांना विकास हवा असून त्यांचे हिंदूत्वाचे ढोंग उघडे पडले असल्याचा टोलाही आमदार चव्हाण यांनी लगावला.

Web Title: chandrakant khaire satish chavan politics