'विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीचा नवा फॉर्म्युला'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

'महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांपैकी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढवणार आहे, तर 18 जागा घटकपक्षांना दिल्या जातील,' अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी हे समीकरण सांगितले आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. त्यानंतर आता दोन्ही पक्ष विधानसभेतही एकत्रच लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोण किती जागा लढवणार याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांतील कुठल्याही नेत्याने भाष्य केलेले नसले तरी भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज युतीच्या फॉर्म्युला सांगितला आहे. 

भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना जास्त जागा लढवणार, हे सुरुवातीपासूनचं समीकरण होतं. पण आता राजकीय परिस्थिती पलटली आहे. विधानसभा निवडणुकीतील युतीतही आता समसमान जागा लढवण्यात येतील, अशी चिन्ह आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

'महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांपैकी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढवणार आहे, तर 18 जागा घटकपक्षांना दिल्या जातील,' अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी हे समीकरण सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil reaction on shivsena bjp alliance in vidhansabha election